तिथवली-चिंचवली ग्रामस्थांच्यावतीने आमदार नितेश राणेंचा सत्कार

2

कणकवली, ता.१२ ः येथील तिथवली-चिंचवली या सुखनदीवर असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणार्‍या आमदार नितेश राणे यांचा जाहिर नागरी सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खारेपाटण-चिंचवली रेल्वेस्टेशन संघर्ष समिती यांच्यावतीने सोमवारी 15 जुलैला सायंकाळी 4 वाजता श्रीकांत भालेकर यांच्या निवासस्थानी हा सत्कार होणार आहे. त्या ठिकाणी पुल उभारण्यात यावा अशी मागणी गेली अनेक वर्षे होती. या मागणीबाबत वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा कोणी लक्ष दिला नव्हता. मात्र राणे यांनी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला आहे. त्यामुळे त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा हा सत्कार आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती चिंचवली रेल्वेस्टेशन संघर्ष समितीचे अध्यक्ष नासिर काझी व सुर्यकांत भालेकर यांनी दिली.

4