कणकवली, ता.१२: वैभववाडी तालुक्यातील तिथवली येथील धरण्याच्या गेटचे जुने साहित्य चोरी करण्याच्या उद्देशाने टेम्पोत भरत असताना रंगेहाथ पकडलेल्या दोन संशयितांसह उर्वरित तीन मिळून एकूण पाच संशयितांना शुक्रवारी कणकवली न्यायालयात हजर केले असता त्यांची सशर्त जामिनावर मुक्तता करण्यात आली. संशयितांच्या वतीने अॅड. अक्षय चिंदरकर, अॅड. विराज भोसले यांनी काम पाहिले.
या बाबत दाखल फिर्यादीनुसार संशयित राजाराम प्रभू इंगळे, भिमराव प्रभू इंगळे, राजू कोंडिबा शिंदे, लक्षण तुळजाराम शिंदे (सर्व कासार्डे आनंदनगर) व विनोद पुंडलिक वाघमारे (साखरपा – राजापूर) यांच्यावर 10 जुलै रोजी गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती. संशयितांना 11 जुलै रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. एका दिवसाच्या पोलिस कोठडीनंतर संशयितांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना अजून पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. यात पोलिसांनी संशयित हे भंगार खरेदी – विक्रीचा व्यवसाय करत असून, त्यांनी शासकीय मालमत्तेची चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशा प्रकारचे गुन्हे दाखल असून, त्यात या संशयितांचा सहभाग आहे किंवा कसे या बाबत तपास करायचा आहे. यातील पहिल्या चार आरोपींची कासार्डे येथे व साखरपा येथील आरोपीचे भंगाराची दुकाने आहेत. त्यामुळे तेथे जात त्यांच्याकडे शासकीय मालमत्तेची चोरी करण्यात आली आहे का? या बाबत तपास करणे आदी कारणांसाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली.
मात्र या प्रकरणी संशयितांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानत पाचही संशयितांची जामीनावर मुक्तता करण्यात आली.
——————–
धरणाच्या गेटचे साहित्य चोरणार्यांची जामिनावर मुक्तता
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES