माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजन…
वेंगुर्ले ता.१२:
भारतीय जनता पार्टी, वेंगुर्ले च्या वतीने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खर्डेकर महाविद्यालयात व्रुक्ष वाटप व व्रुक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खर्डेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना भाजपा प्रदेश चिटनीस राजन तेली व नगराध्यक्ष राजन गिरप यांचे हस्ते व्रुक्ष वाटप करून त्या नंतर व्रुक्षारोपण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई, प्र. प्राचार्य प्रदीप होडावडेकर, नगरसेवक सुहास गवंडळकर, पर्यवेक्षक शिंदे सर , प्रा.जे.वाय. नाईक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजन तेली म्हणाले की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी कमी – कमी होत चालली आहे त्यासाठी व्रुक्ष लागवड करणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीरभाऊ मुणगट्टीवार यांनी ह्या वर्षी 33 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परसात एक तरी झाड लावले पाहिजे. यावेळी खर्डेकर महाविद्यालयाच्या आवारात माजी आम. राजन तेली व नगराध्यक्ष राजन गिरप यांचे हस्ते व्रुक्षारोपण करण्यात आले .या कार्यक्रमाला मच्छिमार नेते दादा केळुसकर , प्रकाश धावडे, एन.एस.एस.विभागाचे चव्हाण सर, प्रा. आनंद बांदेकर , प्रा. नंदगीरीकर , प्रा. आरोलकर , प्रा. बिराजदार , प्रा. पी.जी.देसाई , प्रा. पाटोळे , प्रा. वीरेंद्र देसाई तसेच इतर प्राध्यापक उपस्थित होते.