कणकवलीत ३१ मे २०१७ मध्ये घडला होता प्रकार
कणकवली, ता. 12 : शहरातील कापड व्यापार्यावर ब्लेडने हल्ला करणार्या साजिद फकीर याला कणकवली न्यायालयाने 8 महिने सक्षम कारावासाची सजा सुनावली आहे. ब्लेडने वार करण्याची घटना 31 मे 2017 रोजी घडली होती.
कणकवली बाजारपेठेत महापुरुष कॉम्प्लेक्स मध्ये निजामुद्दीन मन्सुरी यांचे दुकान आहे. 31 मे 2017 रोजी ते दुकानात काम करत असताना आरोपी साजिद फकीर याने वाद उकरून काढला. तसेच निजामुद्दीन च्या दोन्ही हातांवर ब्लेडने वार केले होते. या हल्ल्यात निजामुद्दीन हे जखमी झाले होते. त्यांच्या फिर्यादीवरून साजिद फकीरवर गुन्हा दाखल झाला होता. कणकवली न्यायालयात नुकतीच या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. सरकारी वकील अॅड.गजानन तोडकरी यांनी सरकारच्या वतीने काम पाहिले. सुनावणीदरम्यान सहा साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीअंती न्यायाधीश सलीम जमादार यांनी साजिद फकिरला दोषी धरत 8 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.