चंद्रकांत कासार:केसरकरांची काम करण्याची पद्धत शिवसेनेने स्वीकारली…
सावंतवाडी ता,१२: पालकमंत्री दीपक केसरकर यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे.त्यांना शिवसेनेतून सवलत दिली आहे.त्यामुळे वारा आल्यानंतर दिशा बदलणाऱ्या लोकांना शिवसेनेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही,असे प्रत्युत्तर आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे पदाधिकारी चंद्रकांत कासार यांनी आज दिले.पक्षात एखादी नाराजी असल्यास ती उघड मांडण्याची भूमिका शिवसेनेत नाही.त्यामुळे काल येथे झालेल्या आरोपांत तथ्य नाही.ते सर्व आरोप राजकीय आकसातून होते,असेही यावेळी त्यांनी सांगितले.
पालकमंत्री श्री.केसरकर यांच्या विरोधात काल येथील जुन्या शिवसैनिकांनी पत्रकार परिषद घेतली होती.आपण माजी शिवसैनिक आहोत,असे सांगून त्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री केसरकर यांच्यावर टीका केली होती.यात केसरकर यांचे धोरण मुळमुळीत असल्याचे त्यांनी म्हटले होते .या टीकेला आज श्री.कासार यांनी उत्तर दिले.यावेळी अशोक दळवी,एकनाथ नारोजी ,विनोद ठाकुर आदी उपस्थित होते .
या वेळी कासार म्हणाले शिवसेनेत राजकारण आणि समाजकारण असे दोन भाग आहेत.काही लोकांनी आपण शिवसैनिक आहोत असे सांगून पालकमंत्र्यांवर टीका केली आहे.ते चुकीचे आहे,जे आजपर्यंत केसरकर सोबत होते ते भाई देऊलकर येण्याचे बंद झाले.त्याचे उत्तर द्यावे पालकमंत्री केसरकर त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे.जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणे हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे.त्यांनी कधीही गुंडगिरीचे समर्थन केले नाही.त्यामुळे वाऱ्याच्या दिशेने आपली भुमिका बदलणाऱ्या लोकांना उत्तर काय द्यायचे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.