कणकवली, ता.२१ : कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत उद्या १३ जुलै रोजी महारक्तदान शिबिर होणार आहे. कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात हे शिबिर होणार असून यात जिल्ह्यातील ५०० हून अधिक रक्तदात्यांचा सहभाग असणार असल्याची माहिती संदेश पारकर मित्रमंडळाकडून देण्यात आली.
संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित दरवर्षी महारक्तदान शिबिर आयोजित केले जाते. यात जिल्ह्यातील पारकरप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होतात. यंदाही पाचशे पेक्षा अधिक रक्तदात्यांचा सहभाग असणार आहे. त्यादृष्टीने शहरातील कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत हे महारक्तदान शिबिर होणार आहे. रक्तदान श्रेष्ठदान हा संदेश देत रक्तदानाचे महत्व गेली अनेक वर्षे संदेशप्रेमी रक्तदाते समाजाला प्रत्यक्ष कृतीतून देत आहेत. एकाच शिबिरात 500 रक्तबाटल्या संकलन होणारे अवघ्या जिल्ह्यातील एकमेव रक्तदान शिबिर ठरले आहे. रक्तदान शिबिरात सहभागी होण्यासाठी नगरसेवक रूपेश नार्वेकर मोबा. 9637428080 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पारकरांच्या वाढदिनानिमित्त कणकवलीत उद्या महारक्तदान शिबिर
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES