वेंगुर्ले-खवणे किनार्‍यावर आढळली अज्ञात होडी…

2

वेंगुर्ले,ता.१२ : तालुक्यातील खवणे समुद्रात किनाऱ्या पासून काही अंतरावर आतमध्ये इंजिन असलेली एक मोठी होडी पाण्याबरोबर वाहून आली आहे. मात्र सुमारे ३५ फूट लांब असलेली ही होडी उलट्या स्थितीत असल्याने ग्रामस्थांना ती बाहेर काढता आली नाही.
खवणे किनाऱ्यावरील नस्ताच्या ठिकाणी आज सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास ही ३ मीटर रुंद व ३५ फूट लांब असलेली इंजिन असलेली होडी दिसून आली. वाळू काढण्यासाठी अशा होड्यांचा वापर केला जातो. त्या वेळी समुद्र किनारी असलेल्या मच्छिमार बांधवांनी ती होडी पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.मात्र उलट दिशेने ही होडी मातीत रुतली असल्याने ती बाहेर काढता आली नाही. या बाबत ग्रामस्थांनी निवती पोलिसांना माहिती दिली. त्या नुसार पोलिसांनी येऊन पहाणी केली असून पाण्याबरोबर ती होडी वाहून जाऊ नये या साठी किनाऱ्यावर दोरीने बांधून ठेवण्यात आली आहे. समुद्राच्या ओहोटीच्या वेळी ती होडी बाहेर काढण्यात येणार आहे. तुर्थास तरी ती होडी कुणाची आहे हे समजलेले नाही.

4

4