वेगुर्ला-आडेली पंचक्रोशी सहा दिवस अंधारात

179
2

तात्काळ वीज पुरवठा सुरू करा,अन्यथा आंदोलन ग्रामस्थांचा इशारा

वेंगुर्ला ता.१३: येथील आडेली खुटवळवाडी व सोनसुरकरवाडी गेले सहा दिवस अंधारात आहे. तुटलेल्या वीजवाहिन्या दुरुस्त करण्यासाठी वीज कंपनीचे अधिकारी व ठेकेदार एकमेकांकडे बोट दाखवत असल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान तात्काळ वीज पुरवठा सुरु करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करा,अन्यथा वीज कार्यालय समोर बसून आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
परिसरात झाड कोसळल्यामुळे मुख्य वाहिन्या तुटले होत्या.परंतु सहा दिवस झाले तरी अद्याप ते काम केलेले नाही.अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर वायरमन ऐकत नाहीत त्यामुळे ठेकेदारांकडून काम करून घेतल्याशिवाय पर्याय नाही,असे सांगून अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.परिणामी सहा दिवस परिसरात काळोख आहे.दिवसाचे ठीक आहे,रात्री अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते,असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.त्यामुळे याबाबत तात्काळ योग्य ती भूमिका न घेतल्यास जन आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

4