दोडामार्ग, ता. १३ : संजय देसाई यांच्या उपोषणाच्या निवेदनात मांडण्यात आलेल्या अनेक समस्या या प्रगतीपथावर आहेत. १४ व्या वित्त आयोगातून शाळेचा ध्वजस्तंभ तसेच मुलांना खेळण्यासाठी आलेली घसरगुंडी झोपाळे इत्यादींच्या दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाकडे निधीसाठी मागणी केली आहे. शाळेसमोर गतिरोधकाची आवश्यकता आहे. परंतु अंदाजपत्रक न मिळाल्याने ते काम राहिले आहे. लवकरच तेही काम पूर्ण करू तसेच ग्रामपंचायत मार्फत फिल्टर देऊन पाण्याची व्यवस्था केली जाईल, असे कोलझर सरपंच उर्मिला देसाई यांनी दूरध्वनीद्वारे बोलताना स्पष्ट केले आहे. मी महिला सरपंच असल्याने ग्रामपंचायत मार्फत येणाऱ्या सोयी सुविधा व योजना गावातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
देसाई यांच्या निवेदनात मांडण्यात आलेल्या सर्व समस्या प्रगतीपथावर – उर्मिला देसाई
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES