कोलझर शाळेतील समस्या न सोडवण्यास उपोषण : संजय देसाई

194
2
Google search engine
Google search engine

दोडामार्ग / सुमित दळवी, ता. १३ : कोलझर शाळेतील असलेल्या विविध समस्या न सोडवण्यास उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा कोलझर ग्रामस्थ संजय देसाई यांनी दिला आहे. ग्रामपंचायत कोलझर यांनी १ वर्षापूर्वी लेखी स्वरूपात निवेदन देऊन सुद्धा कोलझर जिल्हा परिषद शाळाची कामे पूर्ण ना केल्याने कोलझर शाळेसमोरील गेट ध्वजस्तंभ मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी झोपाळे इत्यादी सुविधांपासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे. शाळेतील मुलांना पिण्याचे शुद्ध पाणी व शाळेसमोरील गतिरोधक काढणे आणि शाळेच्या कंपाउंडमध्ये असलेल्या धोकादायक विद्युत लाईन बाजूला करणे इत्यादी कामे मार्गी न लागल्याने ग्रामस्थ पालक व मुले यांच्या समवेत १५ जुलै २०१९ रोजी ग्रामपंचायत कोलझरच्या समोर उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय देसाई यांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत सरपंच तहसीलदार दोडामार्ग गटशिक्षण अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.