वीज वाहीन्या अंगावर कोसळल्याने कोलगावात गाईचा मृत्यू…

302
2

सावंतवाडी, ता.१३: कोलगाव-मेटवाडी येथे वीजवाहीनी अंगावर पडल्यामुळे गाय जागीच ठार झाली.यात सुमारे पंचवीस हजाराचे नुकसान झाले आहे.हा प्रकार आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला.
शंकर सावंत असे संबंधित शेतकऱ्याचे नाव आहे.याबाबत वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माहिती देऊन सुध्दा कोणीही त्या ठिकाणी दाखल झाले नाही,त्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.जीर्ण झालेली वीज वाहिनी पडल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

4