वैभव नाईक : कणकवलीत महारक्तदान शिबिर
कणकवली, ता.13 : महामार्ग चौपदरीकरणातील समस्या संदेश पारकर यांनी तडफेने मार्गी लावल्या आहेत. राजकारणापेक्षा ते जनतेच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देत असल्याने त्यांना जनतेचा वाढता पाठिंबा मिळतोय. जनतेच्या या पाठबळावरच ते लवकरच आमदारही होतील अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी येथे दिली.
शहरातील कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात महाक्तदान शिबिर झाले. यात जिल्ह्यातील 510 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार वैभव नाईक बोलत होते. यावेळी भाजपा युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी अरुणा पाटकर, जयदेव कदम, अवधूत मालणकर, संदेश सावंत- पटेल, आनंद अंधारी, प्रज्ञा ढवण, संतोष किंजवडेकर, रवी तिर्लॉटकर, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, महेश सावंत , राजन वराडकर, परशुराम झगडे, सचिन जोईल, सुनील पारकर, मेघा सावंत, सुमेधा अंधारी, प्रसाद अंधारी आदी उपस्थित होते.
श्री.नाईक म्हणाले, पारकर यांच्याकडे पद असो अथवा नसो. ते समाजासाठी नेहमीच कार्यरत असतात. सिंधुदुर्गातील राजकीय समीकरणे अनेकवेळा बदलली .पण पारकर यांच्या सामाजिक कार्याचे समीकरण बदललेले नाही. यापुढील काळात पारकरांसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायला हवे.
ं संदेश पारकर म्हणाले, इथली जनता चांगल्या कामाच्या नेहमीच पाठीशी राहिली आहे. त्यामुळे महारक्तदान शिबिरा सारख्या उपक्रमाला जनतेचं चांगलं पाठबळ मिळत आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून यापुढेही आम्ही जनतेची सेवा करीत राहणार आहोत. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. यातून अनेकांचे प्राण वाचत असतात. तसेच समाजामध्येही रक्तदात्यांबद्दल आदराची भावना असते. त्यामुळे रक्तदानाचे कार्य असेच अविरतपणे सुरू ठेवणार आहोत.
अरुणा पाटकर म्हणाल्या, संदेश पारकर हे लोकनेते असून त्यांच्यासारखा नेता लाभला हे कोकणचे भाग्य आहे. यावेळी जयदेव कदम, आनंद अंधारी आदी मान्यवरानीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी तर आभार अवधूत मालणकर यांनी मानले.