पालकमंत्री केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीर : राजन पोकळे

159
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी, ता. १३ : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सावंतवाडीत शिवसेनेच्यावतीने १६ व १७ जुलैला महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पालकमंत्री केसरकर मित्रमंडळाने हे आयोजन केले आहे. याबाबतची माहिती माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी दिली.

पालकमंत्री केसरकर यांचा १८ जुलैला वाढदिवस आहे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा देखील वाढदिवस आहे. यानिमीत्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दरम्यान समाजोपयोगी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात १६ व १७ जुलैला महाआरोग्य शिबिर होणार आहे. हे शिबिर सकाळी१० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होईल. या शिबिरास डॉ. जी. पी. टारपे (जनरल सर्जन), डॉ. अभिजित चितारी (हद्यय रोग तज्ञ), डॉ. संजीव आकेरकर (हृदयरोग तज्ञ), डॉ. संदीप सावंत (बालरोग तज्ञ), डॉ. डी. टी. दुर्भाटकर (स्त्री रोग तज्ञ), डॉ. शिवशरण (बालरोग तज्ञ), डॉ. शंतनू तेंडुलकर हे डाॅक्टर उपस्थित राहून मोफत तपासणी करणार आहेत. मणिपाल हॉस्पिटलचे डॉक्टर १७ जुलै रोजी उपस्थित राहणार आहेत. त्यात डॉ. राकेश देशमाने, डॉ.विनायाग पांडीयान, डॉ.जगन्नाथ कुलकर्णी ,डॉ. रेंट, डॉ. रोहन बाडावे हे उपस्थित राहणार आहेत. या माेफत महाआरोग्य शिबीराचा जनतेने लाभ घ्यावा आरोग्य तपासणी करण्यासाठी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन केसरकर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

\