Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याअखेर मालवण बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या कामास सुरवात...

अखेर मालवण बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या कामास सुरवात…

मालवण, ता. १३ : मालवण बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या बांधकामास आजपासून सुरवात करण्यात आली. आमदार वैभव नाईक यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सुसज्ज बसस्थानक उभारण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर ३ कोटी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. या बसस्थानकात आमदार नाईक यांच्या संकल्पनेतून सिनेमागृहाचीही निर्मिती होणार आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी ७ मार्चला या बसस्थानकाच्या कामाचे भूमिपूजन झाले. मात्र पालिका हद्दीतील इमारत बांधकामाची परवानगी गेले चार महिना पालिका प्रशासन स्तरावर रखडली होती. इमारत बांधकाम सुरू न झाल्याने पंचायत समिती बैठकीतही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याप्रश्नी आमदार वैभव नाईक यांनी आगार व्यवस्थापक व पालिका अधिकाऱ्यांना गेल्या आठवड्यात फैलावर घेतल्यानंतर बांधकामास परवानगी देण्यात आली. दरम्यान जीर्ण इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळून एक प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे इमारतीचे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना आमदार नाईक यांनी आगारव्यवस्थापकांना दिल्या. आठ दिवसात काम सुरू न झाल्यास विभाग नियंत्रकांना मालवणात आणून काम सुरू करून घेण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे एसटी प्रशासन व संबंधित ठेकेदाराने तत्काळ इमारतीच्या बांधकामास आजपासून सुरवात केली आहे.
बसस्थानकाच्या जुन्या इमारतीच्या पाठीमागील जागेत नवीन इमारत उभारली जाणार आहे. त्याठिकाणी कामास सुरवात करून शेड उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे इमारत बांधणी होईपर्यंत डेपोत येणार्‍या गाड्या वळविण्यासाठी प्रवासी वर्गाच्या बैठक व्यवस्थेसाठी असलेली पत्र्याची शेड हटविली आहे. इमारत उभारणीसाठी आवश्यक सुविधा तयार करून कामास सुरवात केली जात असल्याचे आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली.
नव्या बसस्थानक इमारतीच्या तळमजल्याला ६ प्लॅटफॉर्म, पॅसेंजर हॉल, पुरुष महिला स्वच्छता गृह, कॅन्टीग, वेटिंग हॉल, दुकान गाळे, लेडीज रेस्ट रूम, हिरकणी कक्ष, जेनेरिक मेडिसिन स्टोअर व सर्व अद्ययावत सोयी सुविधा असतील. पहिल्या मजल्यावर बसस्थानकाच्या कामकाजाची कार्यालये तर वरच्या मजल्यावर अद्ययावत असे ६० आसनक्षमतेचे सिनेमागृह साकारले जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments