कासार्डे येथील ओहोळात तरुण बुडाला : उद्या पुन्हा शोध मोहीम सुरू होणार

2

कणकवली, ता. १३ : कासार्डे येथील नागसावंतवाडी बंधार्‍यात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी राहुल आनंद पाटील (वय 25, रा.राधानगरी मोहोड) हा आज सकाळी दहाच्या सुमारास बुडाला. राहुल हा तेथील एका मायनिंग कंपनीत डोजर ऑपरेटर म्हणून काम करत होता. तो आपल्या दोन मित्रांसमवेत तेथील बंधार्‍यात पोहायला गेला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. या घटनेनंतर स्थानिकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली. आज सायंकाळपर्यंत त्याच्या शोधासाठी मोहीम राबविण्यात आली. उद्या (ता.14) पुन्हा शोध मोहीम सुरू होणार असून, त्यासाठी मालवण येथून स्कूबा डायव्हिंग या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

4