असरोंडी चिरेखाण येथील डबक्यात पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू

2

कणकवली, , ता. १३ : चिरेखाणीलगतच्या डबक्यात पडल्याने दोन वर्षाच्या चिमुकल्याचा आज मृत्यू झाला. सकाळी 11.30 च्या सुमारास असरोंडी (ता.मालवण) येथील चिरेखाणीवर ही घटना घडली. गणेश मल्हारी बंडगर असे त्या दुदैवी चिमुकल्याचे नाव आहे. मल्हारी हरीबा बंडगर (रा.जत-विठ्ठलनगर, जि.सांगली) यांचे कुटुंब असरोंडी चिरेखाणीवर कामाला आहे. ते खाणीवरच झोपडी बांधून राहतात. आज सकाळी साडे नऊच्या सुमारास दोन वर्षाचा चिमुकला गणेश खेळण्यासाठी झोपडी बाहेर पडला होता. दुपारी साडे अकरा च्या सुमारास तो दिसेनासा झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. यावेळी तेथीलच एका पाण्याच्या डबक्यात तो पडलेला दिसला. त्याला तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तो मृत झाल्याचे जाहीर केले.

23

4