कणकवलीत उद्या संदेश पारकर यांच्या वाढदिवसाचा सोहळा

2

विविध क्षेत्रातील मान्यवरांची असणार उपस्थिती : विविध स्पर्धांतील विजेत्यांचाही होणार सत्कार

कणकवली, ता. १३ : भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसाचा सोहळा उद्या (ता.14) सकाळी 11 वाजता भगवती मंगल कार्यालय येथे साजरा होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. याखेरीज पारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार देखील होणार आहे.
उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून शहरात विविध ठिकाणी संदेश पारकर प्रेमींच्यावतीने वाढदिवसाचा केक कापण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर भगवती मंगल कार्यालयात पारकर हे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. संदेश पारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेले आठवडाभर फुटबॉल स्पर्धा, कॅरम स्पर्धा, काव्योत्सव, निबंध, चित्रकला, मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार उद्या (ता.14) सकाळी 11 वाजता भगवती मंगल कार्यालयात गौरविण्यात येणार आहे. यानंतर याच कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. याखेरीज सायंकाळी 4 वाजता मातोश्री मंगल कार्यालय येथे महिलांसाठी योगा शिबिर होणार आहे.
पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरातील एचपीसीएल सभागृहात महारक्तदान शिबिर झाले. यात 510 जणांनी सहभाग घेतला. त्यानंतर वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण येथे होणार्‍या महाशस्त्रक्रिया शिबिरासाठी नोंदणी करण्यात आली. याखेरीज भालचंद्र आश्रमात भजनांचा डबलबारी सामना रंगला होता. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने संगीत रसिकांनी गर्दी केली होती. याखेरीज काव्योत्सव कार्यक्रमालाही जिल्ह्यातील कवींनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान उद्या (ता.14) भगवती मंगल कार्यालयात होणार्‍या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संदेश पारकर मित्रमंडळाने केले आहे.

1

4