मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांच्या आढाव्यासाठी १७ जुलैला मंत्रालयात बैठक…

159
2

मालवण, ता. १३ : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत कुडाळ- मालवण तालुक्यात केलेल्या विकास कामांची आढावा बैठक १७ जुलैला सकाळी ११.३० वाजता मुंबई येथे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात होणार आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत कोट्यवधींच्या निधीतून कुडाळ- मालवण तालुक्यात आमदार नाईक यांच्या माध्यमातून दुरवस्था झालेल्या अनेक रस्त्यांची कामे केली आहेत. यातील काही पूर्ण झाली आहेत तर काही मंजूर आहेत. पावसाळ्यानंतर ही सर्व कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे वरिष्ठ अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

4