सावंतवाडी, ता. १४ : विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे हरिनाम विणा सप्ताह तसेच आषाढी एकादशी निमित्त 3 जुलै व 4 जुलै रोजी अर्चना फाऊंडेशन पुरस्कृत खुली अभंग गायन स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनिरिक्षक, उद्योजिका व अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांच्या हस्ते व विठ्ठल मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ १२ जुलै रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून संपन्न झाला.
सदर स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. युवागट १५ ते ३५ वयापर्यंत व विवाहीत महिला व पुरुष, वयोमर्यादा ५० वर्ष होती.
युवा गटात प्रथम क्रमांक पवन यशवंत पवार, द्वितीय क्रमांक विनय प्रदिप वझे यांना तर तृतीय क्रमांक नितीन धामापूरकर यांना मिळाला. तर हर्षद मेस्त्री, मधुरा खानोलकर, देवयानी केसरकर यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
प्रौढगटात प्रथम क्रमांक अँड. सौ. सिद्धि विनायक परब द्वितीय क्रमांक मधुसूदन गोसावी यांना तर तृतीय क्रमांक गितेश गणू कांबळी यांना मिळाला. तर सौ. अनामिका मेस्त्री, सौ. मानसी वझे, सौ. स्मिता वैभव केंकरे यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
यावेळी बोलताना सौ. घारे परब यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले. आषाढी एकादशीनिमित्त आलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर भजन, अभंग गायन ही आपली संस्कृती आहे. ती जतन करण्याचे काम तरुण पिढीकडून होत आहे हे कौतुकास्पद आहे. पुढील काळातही असच युवकांना प्रोत्साहन देण्याचे काम करणार असे आश्वासन दिले.
या वेळी श्री. नेवगी, श्री. बोर्डेकर, निलेश मेस्त्री, किशोर सावंत, निरज मिलिंद भोसले, सोमा सावंत, अर्चना फाऊंडेशनचे संचालक विनायक परब , रामदास गवस श्रीम. प्रिया परब इ. मान्यवर भाविक व श्रोते उपस्थीत होते. कार्यक्रमाचे नियोजन सद्गुरु संगीत विद्यालय सावंतवाडी श्री निलेश मेस्त्री व सहकारी यांनी केले व निवेदन संजय कात्रे यांनी केले.