सावंतवाडी / दत्तप्रसाद पोकळे, ता. १४ : येथील आंबोली प्रमाणेच वर्षा पर्यटनाचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या माळशेज घाटात पावसाळी पर्यटनासाठी घाटात येणाऱ्या पर्यटकांना प्रशासनाकडून ३१ जुलैपर्यंत पर्यटनबंदी करण्यात आली आहे.निव्वळ माळशेजचे पावसाळी सौन्दर्य बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या गोवा व लगतच्या पर्यटकांचा यामुळे हिरमोड झाला आहे.दरम्यान,माळशेज घाटातील पर्यटन बंदीचा फायदा आंबोलीतील वर्षा पर्यटनाला होण्याची शक्यता आहे.
प.घाटातील माळशेज घाट वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.ठाणे जिल्ह्यातील या घाटात कास,ताम्हिणी, महाबळेश्वर प्रमाणेच पावसाळ्यात वर्षा पर्यटनासाठी राज्याच्या अनेक भागातून तसेच लगतच्या राज्यातील पर्यटक गर्दी करतात.माळशेज घाटात दरडी पडण्याचे प्रकार तसेच यापूर्वी घडलेल्या दुर्घटनांच्या अनुषंगाने यंदा ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 31 जुलै पर्यंत घाटात पर्यटन बंदी लागू केली आहे.त्यानुसार माळशेज घाटातील चार धबधबे तसेच पर्यटन विभागाने विकसित केलेले दोन पॉइंट, माळशेज घाट, गणेश लेणी, पडाळे डॅम, सिद्धगड या ठिकाणांचा समावेश आहे. घाटाच्या दोन्ही बाजूला ही बंदी लागू करण्यात आली असून,घाटातून वाहतूक सुरू असेल. मात्र, पर्यटकांना कोठेही थांबता येणार नाही.
पावसाळ्यामध्ये मुंबईसह पुणे, नगर, नाशिक भागातून हजारो पर्यटक माळशेज घाटात गर्दी करत असतात.गोवा, कर्नाटक मधील अनेक पर्यटक निव्वळ माळशेजचे पावसाळी सौन्दर्य न्याहाळण्यासाठी माळशेजला जातात.मात्र घाटातील यंदाच्या पर्यटन बंदीमुळे गोवा व लगतच्या पर्यटकांचा यामुळे हिरमोड झाला आहे.मात्र याचा फायदा आंबोलीतील वर्षा पर्यटनाला होण्याची शक्यता असून दरवर्षी पेक्षा जास्त पर्यटक आंबोलीत येण्याची अपेक्षा आहे.
माळशेज घाटात पर्यटकांना प्रशासनाकडून ३१ जुलैपर्यंत पर्यटनबंदी
2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4