Friday, December 13, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासाळगावातील जयहिंद महाविद्यालय सिंधुदुर्गातील शैक्षणिक क्षेत्रातील आयकॉन

साळगावातील जयहिंद महाविद्यालय सिंधुदुर्गातील शैक्षणिक क्षेत्रातील आयकॉन

सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला कुडाळ येथे संस्थेचा गौरव

कुडाळ, ता. १४ : हॉटेल आणि पर्यटन दोन्ही अनुभवसिद्ध करिअर आहेत. या दोन्ही क्षेत्रात वेगळपण सिद्ध करता येते. साळगाव येथील जयहिंद संस्थेने हॉटेल मॅनेजमेंट सारखा पदवी अभ्यासक्रम सुरु करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उज्वल भवितव्य घडविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. आज हे महाविद्यालय सिंधुदुर्गातील शैक्षणिक क्षेत्रातील आयकॉन ठरले आहे अशा शब्दात सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला. कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या प्रथम वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्र्याचे माजी जनसंपर्क अधिकारी सतीश पाटणकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर, दत्तप्रसाद पाटणकर, प्राचार्य केदार लेले, सच्चीदानंद कनयाळकर उपस्थित होते. सुरवातीला साळगावकर यांनी हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाची फिरून पहाणी केली. साळगावसारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना मुंबई – पुण्या सारख्या सर्व सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी संस्थेस धन्यवाद दिले. यावेळी बोलताना साळगावकर म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून हॉटेल व्यवसायाला विशेष महत्व प्राप्त झाल आहे. स्पर्धा वाढली आणि त्यातून या विषयाचा शास्त्रीय अभ्यास वाढला. यातून हॉटेल मॅनेजमेंट नावाचे करिअर उदयास आले. सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसायात हॉटेल व्यवसायाचा आज अग्रक्रम लागतो. हा व्यवसाय वाढत चालल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची गरजसुद्धा मोठया प्रमाणावर निर्माण झाली आहे. हा अभ्यासक्रम प्रगतीच्या नव्या वाटा खुलवू शकतो. काळाची पावले ओळखून संस्थेने सुरु केलेला हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडवेल अशी अपेक्षा साळगावकर यांनी या वेळी व्यक्त केली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांबरोबर पालकही उपस्थित होते.
गैरसमज दूर होण्याची गरज
हॉटेल व्यवसाय क्षेत्रात काम करणे म्हणजे वेटर म्हणून काम करणे किंवा पदार्थ तयार करणे एवढा पूर्वी गैरसमज होता. पण आज या क्षेत्रात ग्लॅमर प्राप्त झाले आहे. हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या आवडीप्रमाणे करिअर करता येते. आज या क्षेत्रातील अनेक मंडळी या क्षेत्रात आयकॉन ठरली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांसाठी ही संधी उपलब्ध झाल्याने या संधीचा लाभ उठविण्याची गरज यावेळी सतीश पाटणकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नाईक तर आभार प्रा. दिपाली गाड यांनी मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments