विकास सावंत:जेलभरो आंदोलनात सर्वानी सहभागी व्हावे
सावंतवाडी, ता. १४ :जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी यापुढे करण्यात येणा-या आंदोलनात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काॅग्रेसची मदत मिळावी,या मागणीसाठी आमदार नितेश राणे आपल्याकडे आले होते ती भेट राजकीय नव्हती अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली दरम्यान सर्वपक्षीयांच्यावतीने १६ तारखेला आयोजित करण्यात आलेल्या जेलभरो आंदोलनात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सावंत यांनी केले.
श्री सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर उपस्थित होते.
यावेळी श्री सावंत यावेळी म्हणाले जिल्ह्यातील महामार्ग प्रश्नावरून १६ तारखेला जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले आहे. सर्व पक्षांकडून हे आंदोलन होत आहे त्यामुळे या आंदोलनात सर्व पक्षांनी सहभागी व्हावे रस्त्याचा प्रश्न हा सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळे या प्रश्न कोणीही राजकारण अथवा श्रेयवादासाठी प्रयत्न करणार नाही असा आमचा निर्णय झालेला आहे त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला व्हावा या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.
श्री सावंत पुढे म्हणाले आमदार राणे हे माझ्या घरी येऊन मला भेटले मात्र त्यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही तर आगामी काळात होणार्या आंदोलनात एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने सहकार्य करावे अशी मागणी करण्यासाठी ते मला भेटले.फक्त तीन मिनीटे चर्चा झाली.