आमदारकीची संधी मिळाल्यास जनतेचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य

210
2
Google search engine
Google search engine

संदेश पारकर यांची ग्वाही ;पारकर यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा,पालकमंत्री, खासदार तसेच मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

कणकवली, ता.14 ः अतूट प्रेम आणि विश्‍वास या पाठबळावरच गेली 30 वर्षे जनतेच्या हृदयात माझे स्थान पक्के झाले आहे. तर माझ्या सहकार्‍यांनीही मला अन्यायाविरोधात लढण्याचे पाठबळ दिले आहे. आता आमदारकीची संधी मिळाली तर याच जनतेचे प्रश्‍न सोडविण्याला माझे प्राधान्य असणार आहे. लोकसभेत पुन्हा एकदा मोदी सरकार विराजमान झाले. त्याच धर्तीवर राज्यातही भाजप शिवसेना युतीचे सरकार असणार आहे. त्यामुळे विरोधी आमदार निवडून देण्याची पद्धत यावेळी मोडीत निघाली पाहिजे. सावंतवाडी आणि कुडाळमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत. तसाच कणकवलीतही भाजप-शिवसेना युतीचा उमेदवार विधानसभेत गेला पाहिजे असे आवाहन कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांनी येथे केले.
संदेश पारकर यांचा 51 वा वाढदिवस कार्यक्रम येथील भगवती मंगल कार्यालयात झाला. यावेळी झालेल्या सत्कार कार्यक्रमाला उत्तर देताना संदेश पारकर बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, माजी आमदार अजित गोगटे, मालवण उपनगराध्यक्ष राजन वराडकर, प्रमोद रावराणे, संदेश पटेल, समृद्धी पारकर, नीलम सावंत-पालव, लक्ष्मण रावराणे, अतुल बंगे, सुमेधा अंधारी, रूपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, मिलिंद साटम, श्रेया गावडे, संजय जगताप, अवधूत मालणकर, जयदेव कदम, सुभाष धुरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.