वेंगुर्ले इनरव्हिल क्लब अध्यक्ष वृंदा गवंडळकर व सचिव गौरी मराठे यांनी स्विकारला पदभार

216
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले : ता. १४एका नविन इनरव्हील वर्षाची सुरुवात करताना अतिशय आनंद होत आहे. इनरव्हिलचा खरा अर्थ मैत्री आणि सेवा असा आहे, आणि या ब्रिदवाक्याला धरुनच इनरव्हील क्लब आज पर्यंत सामजासाठी सेवाभावी उपक्रम घेऊन कार्य करीत असल्याचे प्रतिपादन डॉ. सायली प्रभू यांनी केले. दरम्यान सन २०१९-२० या इनरव्हिल वर्षासाठी वेंगुर्लेच्या नुतन अध्यक्षा म्हणून सौ. वृंदा गवंडळकर तर सचिव पदी गौरी मराठे यांच्यासह सहकाऱ्यांनी पदभार स्विकारला.

वेंगुर्ले इनरव्हील क्लबचा पदग्रहण सोहळा वेंगुर्ले येथील साई मंगल कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमास इनरव्हील आॅफिसर म्हणून कुडाळ येथील पी.डी.सी. डॉ. सायली प्रभू यांनी काम पाहिले. तर प्रमुख पाहुण्या म्हणून वेंगुर्लेच्या पोलिस उपनिरिक्षक रुपाली गोरड यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. इनरव्हिल क्लबच्या वाटचालीत आतापर्यंत रोटरी क्लबचे महत्वपुर्ण व मोलाचे सहकार्य लाभले आहे. मागील वर्षी इनरव्हील क्लब वेंगुर्लेला ‘स्टार क्लब’ म्हणून गौरवीले आहे. या पदग्रहण कार्यक्रमात खजिनदार म्हणून पुनम जाधव तर आयएसओ म्हणून प्रणाली अंधारी यांनी पदभार स्विकारला. या कार्यक्रमाला कुडाळ इनरव्हील क्लब, सावंतवाडी इनरव्हील क्लब, लायनेस क्लब वेंगुर्ले, आम्ही साऱ्या जणी ग्रुप तसेच वेंगुर्लेतील सर्व मैत्रिणी महिला उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इनरव्हील कोआॅर्डनेटर आनंद बांदेकर, माजी अध्यक्षा डॉ. पुजा कर्पे, रोटरी अध्यक्ष राजेश घाटवळ व सर्व रोटरी व इनरव्हील सदस्यांचे सहकार्य लाभले.

\