स्व. शंकरराव साळवी जन्मदिनानिमित्त उद्या कबड्डीतील उत्कृष्ठ खेळाडूंचा सन्मान

169
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी, ता. १४ : सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या आयोजनाखाली उद्या 15 जुलै हा कबड्डी महर्षी स्व. शंकरराव साळवी यांचा जन्मदिवस हा कबड्डी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने किशोर, कुमार व खुला गट राज्य स्पर्धेत जिल्हा संघातून खेळताना विशेष प्राविण्य दाखवणार्‍या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडूंचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
कबड्डी क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ता, ज्येष्ठ पंच तसेच ज्येष्ठ खेळाडू सातत्यपूर्ण स्पर्धा आयोजक संस्था व कबड्डी प्रसिद्धीसाठी अविरत मेहनत घेणार्‍या ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे. कबड्डी खेळ, खेळाडू व संस्था यांच्या विकासासाठी अमुल्य योगदान देणार्‍या ज्येष्ठ संघटकांचा कृतज्ञता पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली 19 वा राष्ट्रीय कबड्डी दिन समारंभ सोमवारी 15 जुलै 2019 रोजी सायंकाळी पाच वाजता कळसुलकर हायस्कुल सावंतवाडी येथे साजरा करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील सुमारे शंभर खेळाडू (पुरुष, महिला) पंचवीस राज्य, राष्ट्रीय पंच तसेच 25 आयोजक संस्था यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिडाप्रेमींना कबड्डी खेळाविषयी प्रेम, आपुलकी व आदर असलेल्या सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर व विकी केरकर यांनी केले आहे.

\