केळुसमधील चक्रिवादळ नुकसानग्रस्थांना राजन तेलींनी दिला मदतीचा हात

2

वेंगुर्ले, ता.१४ : तालुक्यातील केळुस डिमवाडी व खुडासवाडी येथे चक्रिवादळाने नुकसान झालेल्या कुटुंबियांना भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार राजन तेलींनी मदतीचा हात देत ताडपत्रीचे वाटप केले.
वेंगुर्ले तालुक्यातील केळुस डिमवाडी व खुडासवाडी येथे बुधवारी रात्रौ १० च्या दरम्यान चक्रिवादळाने जवळपास घरे,मांगर व माडबागायतीचे मोठे नुकसान झाले आहे.याच पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी या भागाची तातडीने पाहणी करून, नुकसान झालेल्या कुटुंबियांना मदतीचा हात पुढे करून,केळुस डिमवाडी मधील आनंद शिवराम तांडेल, सीताबाई सहदेव तांडेल, तुळाजी वसंत तांडेल,झिलू पुंडलिक तांडेल,बापू गुंडू आसोलकर,सविता सतिश तांडेल या सर्वांना ताडपत्रीचे वाटप केले. तर केळुस खुडासवाडी येथील भद्रसेन गोविंद साटम,सोनू कानू साटम देवू नरहरी साटम या सर्वाना केळुस गावचे उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांनी तेलींनी दिलेल्या ताडपत्रीचे वाटप नुकसान झालेल्या कुटुंबियांना केले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,मच्छीमार नेते दादा केळुसकर, सदा अणावकर, निलेश गवंस, केळुस ग्रामपंचायत उपसंरपंच आबा खवणेकर, ग्रामस्थ संदिप तांडेल, पांडुरंग तांडेल, शरद तांडेल,सचिन मुणनकर,आबा राऊळ,शिवराम तांडेल,सर्वेश तांडेल,सचिन तांडेल,अर्चना तांडेल,अर्चित प्रभू,विजय तांडेल,वैशाली तांडेल,बाळा तांडेल आदी ग्रामस्थ व महिला यावेळी उपस्थित होते.

19

4