कणकवली पंचायत समिती मध्ये चोरीचा प्रयत्न : संगणक घेऊन बाहेर टाकला

2

कणकवली, ता.१५ : कणकवली पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात चोरीचा प्रयत्न काल रात्री झाला. यात चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही मात्र या विभागातील संगणक घेऊन बाहेर टाकला. पंचायत समितीच्या मागील बाजूस असलेला दरवाजा उघडून चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश केला. यानंतर आत मधील 2 संगणक कीबोर्ड प्रिंटर आधी साहित्य घेऊन तेथील जुन्या इमारतीमध्ये नेऊन टाकले.

या चोरीची तक्रार पंचायत समितीने कणकवली पोलिस स्थानकात केली असून पोलिस अध्यापक घटनास्थळी दाखल झालेले नाहीत.

21

4