कारच्या धडकेत वृद्ध जखमी…

2

सावंतवाडीतील घटना;अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविले…

सावंतवाडी ता.१५: चारचाकीची पादचाऱ्याला धडक बसून एक वृद्ध गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना आज सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास येथील जिमखाना मैदान परिसरात घडली.विलास हजारी लाखे,रा.सबनीसवाडा असे जखमी वृद्धाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की संबंधित वृद्ध रस्त्यावरून चालत आपल्या घरी जात होते.दरम्यान आंबोलीहून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या चारचाकीची त्यांना जोरदार धडक बसली.यात त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.दरम्यान जखमीला तात्काळ स्थानिकांनी प्राथमिक उपचारासाठी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

1

4