बांधकाम अधिकाऱ्याने मागितली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडे “लाच”

2

लवकरच पुराव्यानिशी पोल-खोल करू: युवासेनेच्या नाणोसकर यांचा इशारा

सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता. १५ :
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बांधकामची मंजुरी देण्यासाठी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांकडेच लाच मागितल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात शिवसेना व युवासेना आक्रमक झाली असून लवकरच त्या अधिकाऱ्याची पुराव्यासह पोल-खोल करू असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी दिला आहे.
याबाबतची माहिती नाणोसकर यांनी दिली. ते म्हणाले सावंतवाडी येथील एका शिवसेनेच्या पदाधिका-याकडे बांधकामाची परवानगी देण्यासाठी जिल्ह्यातील एका बांधकाम च्या अधिकाऱ्यांनी पैसे मागितले.
हा प्रकार वारंवार सुरू आहे याबाबत “त्या” अधिकाऱ्याला कल्पना देवून सुध्दा संबंधित अधिका-याकडुन हा प्रकार सुरूच आहे.
याबाबत आपल्याकडे कॉल रेकॉर्डिंग तसेच अन्य पुरावे आहेत त्यामुळे हे सर्व पुरावे आपण घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी येत्या दोन दिवसात जिल्हाधिकार्‍यांची भेट घेणार आहे संबंधित अधिकार्‍याकडून सुरू असलेला हा प्रकार चुकीचा असून पालकमंत्री व खासदार यांच्या माध्यमातून त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

2

4