Sunday, January 19, 2025
Google search engine
HomeUncategorizedमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांची सखोल चौकशी करावी...

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांची सखोल चौकशी करावी…

मालवण भाजपची मागणी ; मुख्यमंत्री, बांधकाम, बंदरविकास मंत्र्यांचे वेधले लक्ष…

मालवण, ता. १५ : मालवण तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व रस्ते दुरुस्तीसाठी दिलेल्या निधीतील कामाची सखोल चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी मालवण भाजपच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, बंदरविकास राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे. अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिली.
यात तालुक्यातील चौके बावखोल ते धामापूर रस्ता चौके ते बावखोल पावणाई मंदिर पर्यंतचा रस्ता पूर्ण खचला असून पहिल्या पावसात वाहुन गेला आहे. रस्त्यावरील पाणी निचऱ्याचा मोऱ्या पूर्ण खचल्या आहेत. पावसाचे पाणी वाहण्यासाठी गटाराची व्यवस्था नाही. रस्त्याला कोणतीही लेव्हल नाही. डांबराचे प्रमाण ठेक्यात दिल्याप्रमाणे नाही. आवश्यक बीबीएम नाही, रोलींग नाही, लब्देवाडी ते पालकरवाडी ते भगवंतगड रस्ता पहिल्या पावसात पूर्ण वाहून गेला असून आवश्यक भराव रोलींग न केल्याने भराव वाहून शेतात जाऊन रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
हिर्लेवाडी आचरा गाऊडवाडी ते आचरा काम पूर्णपणे निकृष्ट होऊन रस्ता व मोरीकडील काही भाग वाहून गेला असून मोरीलगतचा रस्ता खचला आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटाराची व्यवस्था केलेली नाही. कोणतीही रस्त्याची देखभाल नाही. ग्रामपंचायतीचा ठराव असूनही चिंदर, त्रिंबक रस्त्यावर कार्यवाही केलेली नाही. रस्ता खचला असून पावसाचे पाणी वाहण्यासाठी कोणत्याही गटाराची व्यवस्था नाही. रस्ता दुरुस्ती विशेष निधीतून राठीवडे, मालवण, हिवाळे कसाल रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्त्याला योग्य ते बीबीएम झाले नाही बॅलन्स नसून साईटपट्टीचे काम निकृष्ट असून गाड्या रुतण्याचे बरेच प्रकार होत आहेत. वळणावर रस्त्याला लेव्हल नसल्याने टु व्हिलरचे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत.
तालुक्यातील २०१६ ते २०१९ पर्यंतच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांची चौकशी करण्यात यावी. जेणेकरून ही कामे कोण करत आहेत हे पण जनतेला समजले पाहिजे. जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे स्वाभिमान पक्षाचेच ठेकेदार करत आहेत. लब्देवाडी ते भगवंतगड रस्ता स्वत: दत्ता सामंत यांचीच कंपनी काम करत आहे. दुसऱ्यावर बोटे दाखवताना जरा आपल्याकडे वळुन पहावे. हायवेचे आंदोलन करताना तालुक्यातील कामांकडेही पाहा व त्या निकृष्ट कामासाठी पण आंदोलन करा नाहीतर जनतेचा डोळ्यात धुळफेक करून सत्तेची स्वप्ने पाहु नका असेही श्री. केनवडेकर यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments