डॉ. कुडाळकर हायस्कूल- प्राथमिकच्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत छत्र्याचे वाटप…

229
2
Google search engine
Google search engine
Google search engine

राधिका कुडाळकर यांच्यावतीने राबविला उपक्रम…

मालवण, ता. १५ : येथील डाॅ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना श्रीमती राधिका दिलिप कुडाळकर यांच्या हस्ते विनामूल्य छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत येताना विविध समस्या भेडसावतात. त्यामुळे मुलांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी यावर्षी शाळेतील पन्नास गरजू विद्यार्थ्यांना श्रीमती राधिका कुडाळकर यांच्यावतीने छत्र्या देण्यात आल्या.
यावेळी श्रीमती राधिका कुडाळकर, मुख्याध्यापिका नंदिनी साटलकर, अजय शिंदे, सुनिल आचार्य, महादेव नाईक, अशोक आठलेकर, सारिका शिंदे, प्राची परब, दर्शना गुळवे, अनुराधा पाटकर, सुप्रिया पाटील, सानिका बांदिवडेकर आदी शिक्षक उपस्थित होते.

\