कळणे येथे बीएसएनएल टॉवरच्या ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न

2

दोडामार्ग, ता. १५ : कळणे येथील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरचे केबीन फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न अज्ञात चोरट्याकडून झाला आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत संबंधित सुरक्षारक्षकाने बांदा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


अज्ञात चोरट्याने केबीनचे दरवाजे कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन बिजागरे त्याला तोडण्यास अपयश आल्याने त्याने कटावणी व अन्य साहित्य तेथेच टाकून पलायन केले. मोबाईल टॉवरसाठी वापरण्यात येत असलेल्या बॅटर्‍या चोरण्यासाठी तो चोरटा आला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबतची माहिती मनसेचे तालुकाध्यक्ष गुरूदास गवंडे यांनी दिली. बीएसएनएलकडून असे प्रकार रोखण्यासाठी टॉवरच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

2

4