राज्याचे बांधकाम मंत्री 31 जुलै रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

175
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गासह रत्नागिरीतील मुंबई-गोवा महामार्गाची करणार पहाणी

सावंतवाडी, ता. १५ : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील येत्या ३१ जुलै रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या महामार्गाची पाहणी करणार आहेत तसेच दैनदिनी अपडेट घेणार असल्याची माहीती भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी दिली .

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महामागेॅचे काम सुरू असून कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्या मंगळवारी बैठक आयोजित केली होती ही बैठक दैनदिनी अपडेट घेण्याच्या आश्वासनामुळे तूर्त स्थगित करण्यात आली आहे असे राजन तेली म्हणाले.

बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील मागील आठवड्यात रायगडला येऊन गेले आता येत्या ३१ जुलै रोजी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतील व मींटीग हाेईल तसेच महामार्गाच्या कामकाजाबाबत दैनंदिनी अधीक्षक अभियंता श्री.नवले यांच्याकडून रोज रात्री दहा वाजता अपडेट घेणार आहेत अशी माहिती भाजपचे चिटणीस राजन तेली यांनी दीली.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कामकाजाबाबत मंत्री श्री.पाटील दैनंदिनी रात्री दहा वाजता अधीक्षक अभियंता श्री. नवले यांच्याकडून अपडेट घेणार असल्याने उद्या मंगळवारी हाेणारी बैठक तूर्त स्थगित करण्यात आली असल्याची माहिती राजन तेली यांनी दिली.