सावंतवाडी ता.१५: येथील राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात १९ वा कबड्डी दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे प्राचार्य श्री पाटील सर ,सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत नेवगी ,कार्याध्यक्ष संजय पेंडेकर ,कार्यवाह दिनेश चव्हाण ,सहकार्यवाह शैलेश नाईक, खजिनदार मार्टिन आल्मेडा राज्य पंच किशोर पाताडे व प्रथमेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश नाईक यांनी केले.आपल्या प्रास्ताविका च्या भाषणात बोलताना कार्यवाह श्री दिनेश चव्हाण यांनी सांगितले की स्वर्गीय कबड्डी महर्षी उर्फ बुवा साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन कबड्डी दिन म्हणून साजरा करते.याप्रसंगी वर्षभरातील राष्ट्रीय स्तरावरील उत्तम कामगिरी करणाऱ्या संघांचा ,खेळाडूंचा, पंच ,प्रशिक्षक कार्यकर्ते ,आयोजक मंडळ आदींचा सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत केला जातो. यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनशी संलग्न असलेल्या जिल्हा कबड्डी संघटनेचे प्रतिनिधी ,खेळाडू, कार्यकर्ते, एकत्र येतात आणि हा कबड्डी दिन थाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. या वर्षीच्या कबड्डी दिनाचे यजमानपद मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने स्वीकारले आहे. श्री चव्हाण म्हणाले कबड्डी महर्षी शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांनी अध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनची धूरा सांभाळली होती आणि त्याच कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा यशस्वी पार पाडल्या तसेच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्राच्या कबड्डीत ओळख निर्माण करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले .त्यांचे या जिल्ह्यावर खूप प्रेम होते .त्यामुळे त्यांच्या योगदानाची आठवण रहावी यासाठी दरवर्षी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन जिल्ह्यात कबड्डी दिन साजरा केला जातो. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना आरपीडी हायस्कूलचे प्राचार्य श्री पाटील सर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन च्या कार्याचा गौरव करताना त्यांनी दिनेश चव्हाण, संजय पेडणेकर , मार्टीन अल्मेडा, शैलेश नाईक सर यांचा आवर्जून उल्लेख केला केला. कबड्डी महर्षी बुवा साळवी यांचा गौरव करताना ते म्हणाले की कबड्डी ला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उंची मिळवून देण्यासाठी बुवा साळवी यांनी आपले जीवन चंदनासारखे झिजवले.त्यांचे कार्य फार मोठे होते .अशा महान व्यक्ती पुन्हा पुन्हा जन्म घेत नाही परंतु त्यांचे आदर्श आणि त्यांचे कार्य हेच आपल्याला प्रेरणादायी ठरते. क्रीडा तपस्वी स्वर्गीय विलास रांगणेकर सर हे आमच्या प्रशालेचे शिस्तप्रिय व बुद्धिवान शिक्षक होते .त्यांच्या बोलण्यात वागण्यात करारीपणा होता .त्यांनी दिलेले खेळासाठी चे योगदान पाहण्याचे भाग्य मला मिळाले .त्यांच्यासोबत काही वर्ष काम करण्याची संधी मिळाली. मुलांनी सातत्यपूर्ण खेळ करून आपला बौद्धिक व शारीरिक विकास करावा असे आवाहन श्री पाटील यांनी याप्रसंगी केले. तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष श्री शशिकांत नेवगी यांनी स्वर्गीय बुवा साळवी व विलास रांगणेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्याध्यक्ष श्री संजय पेडणेकर यांनी 25 ऑक्टोबर हा सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन च्या स्थापनेचा दिवस यावर्षी थाटात साजरा केला जाणार असल्याचे जाहीर केले यावेळी शालेय खेळाडूंना स्वीट्स वाटण्यात आले.
सावंतवाडी राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात १९ वा कबड्डी दिन उत्साहात…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES