जेलभरो आंदोलनांमध्ये मनविसे सहभागी होणार : आशिष सुभेदार

2

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

सावंतवाडी, ता. १५ : शासनाच्या विरोधात सिंधुदुर्गामध्ये १६ जुलै रोजी होणाऱ्या जेलभरो आंदोलनांमध्ये विरोधी पक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सहभागी होणार आहे.तरी तालुक्यातील मनविसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन मनविसेनेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केले आहे.याबाबतची माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रातून दिली आहे.
सिंधुदुर्गात कॉलेजमध्ये जाणारे युवक तसेज नोकरीसाठी जाणारे युवक वर्ग जिह्यातुन जाणाऱ्या महामार्गावर वरून येत जात असतात.त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे या आंदोलनात ते सुद्धा उत्स्फुर्त पणे सहभागी होणार आहेत.मात्र प्रशासनाने हे सर्वपक्षीय आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये.असे केल्यास या आंदोलनाची तीव्रता अजून तीव्र होईल आणि होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार राहील असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

8

4