राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी राज्य सहसचिवपदी एस. एल. सकपाळ

172
2

सिंधुदुर्गनगरी, ता. १५ : राज्य सरकारी गट-ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र या संघटनेच्या राज्य सहसचिव पदी एस एल सपकाळ यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.
या संघटनेचे पंचवार्षिक अधिवेशन राज्याचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्या अध्यक्षतेखाली सांगली येथे पार पडले. यात पुढील पाच वर्षांसाठी नविन राज्यकारीणी व पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष म्हणून भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने, कार्याध्यक्ष भिकू साळूके, कोषाध्यक्ष मार्थड राक्षे, राज्य सहसचिव एस एल सपकाळ यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष किसन धनराज यांनी दिली. यावेळी सरचिटणीस राजन वालावलकर, बी एस राणे, कुमार जाधव, साईनाथ यादव, परशुराम पाटील, मंगेश वेज्रे, मिलींद संर्वे, सचिन माळवे उपस्थित होते. सपकाळ यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

4