दोडामार्ग शिक्षण विभागाचा कारभार रामभरोसे

2

दोडामार्ग – सुमित दळवी : दोडामार्ग शिक्षण विभागाचा कारभार रामभरोसे असून तब्बल पन्नास शिक्षक हे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती दोडामार्ग विकास युवा मंचचे आनंद तळवळकर यांनी गटशिक्षण अधिकारी कार्यालयात दिली. शिक्षण विभागाच्या आस्थापना ची परिस्थिती एकदम बिकट असून एकही कर्मचारी कायमस्वरूपी नसून सर्व कर्मचारी अगदी गटशिक्षण अधिकार्‍यांसह प्रभारी असून त्याही विभागाची अनेक कामे रेंगाळत आहेत.

दोडामार्ग तालुक्‍यात आज पाळये शाळा नंबर 1 मध्ये शिक्षक नसल्याने शाळा बंद आंदोलन छेडले होते यावेळी पालकांसह तालुका विकास मंच च्या अधिकाऱ्यांनी आज गटशिक्षण अधिकाऱ्यांना घेराव घातला यावेळी पटसंख्या ११असूनही आम्हाला एक शिक्षक का? आम्हाला आंदोलन करण्याची लाज वाटते ग्रामस्थांचा अंत पाहता आहे का? ऑनलाईन शिक्षक पद्धत चुकीची असून त्यामुळेच घोळ झाल्याचा संताप या वेळी पालकांनी व्यक्त केला आहे. एक तर आम्हाला शिक्षक द्या अन्यथा शिक्षण विभाग बंद करा असा इशारा पालकांनी दिला.
यावेळी वरिष्ठांना कळवतो व अहवाल देतो ज्यावेळी शिक्षक मिळेल त्यावेळी शिक्षक देतो एक शिक्षक एकापेक्षा जास्त वर्गाला सांभाळून शकतो त्यामुळे एक शिक्षक सद्यस्थितीत पुरेसा आहे असे सांगण्याचा प्रयत्न नदाब गटशिक्षण अधिकारी यांनी केला. यावेळी पालक संतप्त झाले व आमची मूले या शिक्षण विभागाकडून बसवतो तेथेच त्यांची शाळा भरवा असे सांगितले.यावेळी शिक्षक नसेल तर आपल्याकडील उपलब्ध विषय तज्ञापैकी एक विषय तज्ञ हा याठिकाणी पाळये येथे पाठवा असे सुचवले. याला गटशिक्षण अधिकारी नासिर नदाफ यांनी दुजोरा देत जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळेत विषय तज्ञ जालिंदर कदम हे हजर होतील असे सांगितले व या वेळी पालकांनी विषयतज्ञ हजर न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडू असे सांगून मागे घेतला यावेळी दोडामार्ग विकास मंचचे आनंद तळणकर प्रदीप नाईक जीवन सावंत अर्जुन सावंत यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.

16

4