मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम

2

सिंधुदुर्गनगरी, ता. १५ : दिना्ंक 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर अधारित विशेष पुनःरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी न झालेल्या वंचित मतदारांना मतदान नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी व त्यांचा मतदार यादीमद्ये समावेश करण्यासाठी दुसरा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम दिनांक 15 जुलै 2019 ते 19 ऑगस्ट 2019 या कालावधिमध्ये राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. दिनांक 15 जुलै 2019 प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी, दिनांक 15 जुलै ते 30 जुलै दावे व हरकती स्वीकारण्यात येतील, दिनांक 20, 21 व 27, 28 जुलै 2019 रोजी विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात येणार आहे. सदर दिवशी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे उपस्थित राहून नागरिकांकडून नाव नोंदणी, नाव कमी करण्यासाठी व नावात बदल करण्यासाठी अर्ज स्वीकारतील, दिनांक 5 ऑगस्ट 2019 पर्यंत पर्यवेक्षक, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार नोंदमी अधिकारी हे मतदार याद्यांची तपासणी करतील, दिनांक 13 ऑगस्ट 2019 पर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येतील, दिनांक 16 ऑगस्ट 2019 पर्यंत उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार यादीी निरीक्षक हे मतदार याद्यांची तपासणी करतील, दिनांक 19 ऑगस्ट 2019 पर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. . तरी ज्यांचे मतदार यादीत नाव नाही त्यांनी तसेच विशेषतः 18 ते 19 वयोगटातील मतदार व दिव्यांग मतदार यांनी आपले नाव नोंदणी करण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे.

14

4