दोडामार्ग तालुक्यात 95 मि.मी पावसाची नोंद

2

सिंधुदुर्गनगरी, ता. १५ : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 95 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 51.52 मि.मी. पाऊस झाला आहे. 1 जून 2019 पासू आजपर्यंत एकूण 1480.28 मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे. तालुका निहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढील प्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 95 (1680), सावंतवाडी 68 (1270), वेंगुर्ला 20.2 (1556.24), कुडाळ 80 (1496), मालवण 18 (1260), कणकवली 84 (1684), देवगड 11 (1213), वैभववाडी 36 (1683) पाऊस झाला आहे.

10

4