मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कट्टा गुरामवाडीत सोलर लाईटचे लोकार्पण…

2

मालवण, ता. १६ : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खालची गुरामवाडी-कट्टा येथे म.न.लॉ.सेना अध्यक्ष गणेश कदम यांच्या सौजन्याने सोलर लाईटचे लोकार्पण करण्यात आले. शिवराम गुराम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन उदघाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर, मनलॉसे सिंधुदुर्ग जिल्हासंपर्क अध्यक्ष प्रशांत बागवे, दिपक गुराम, दर्शन गुरव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी श्री. ठाकरे यांचे आभार मानले.

12

4