देवळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २१ जुलैला सत्कार समारंभ…

2

मालवण, ता. १६ : सिंधुदुर्ग जिल्हा देवळी समाज उन्नती मंडळ मालवण शाखेच्यावतीने तालुक्यातील ज्ञाती बांधवांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ २१ जुलैला सकाळी दहा वाजता सिद्धिविनायक मंगल कार्यालय गाड वायरी येथे होणार आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी दिली.
देवळी समाजातील इयत्ता चौथी, सातवी शिष्यवृत्तीधारक, दहावी, बारावी, पंधरावी, इंजिनिअरिंग, उच्च शिक्षित पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी संबंधित विद्यार्थी, पालकांसह, ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सचिव मारुती आचरेकर, दादा परुळेकर यांनी केले आहे.

35

4