सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आज मोफत आरोग्य शिबीर…

160
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन…

सावंतवाडी ता.१६: पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज येथील उपजिल्हा रुग्णालय मणिपाल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत या शिबिराचा लाभ घेतला.दरम्यान या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती.
पालकमंत्री श्री.केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यापैकी सावंतवाडीत घेण्यात येणाऱ्या भव्य मोफत आरोग्य शिबिराला आज सुरुवात झाली.यावेळी विविध आजारावरील येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.जी.पी.टापरे,डॉ.अभिजित चितारी,डॉ.संजीव आकेरकर,डॉ. संदीप सावंत,डॉ. डी. टी. दुर्भाटकर,डॉ .शिवशरण, डॉ.शंतनु तेंडुलकर तर गोवा मणिपाल हॉस्पिटल मधील डॉ राकेश देशमाने डॉ.विनायगा पांडियान,डॉ.जगन्नाथ कुलकर्णी,डॉ.रेंट, डॉ.रोहन बाडावे आदि तज्ञांकडून या तपासण्या व उपचार करण्यात आले.
यावेळी अशोक दळवी,प्रकाश बिद्रे,सागर नाणोसकर,योगेश नाईक,गजानन नाटेकर,विशाल सावंत,प्रशांत कोठावळे,ऍड.नीता सावंत,अपर्णा कोठावळे,अनारोजीन लोबो,चित्रा धुरी आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

\