जेलभरो आंदोलन करण्यापुर्वी चर्चा करून प्रश्न सुटला असता : दिपक केसरकर

342
2

सावंतवाडी/सिध्देश सावंत,ता.१६: आंदोलन हा लोकशाहीचा ’मार्ग आहे. त्याला ’मी विरोध करणार नाही.परंतू आंदोलकांच्या नेमक्या काय मागण्या होत्या याबाबत ’माहीती देन्यात आली असती तर चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न निश्चितच सुटू शकला असता अशी प्रतिक्रीया पालकमंत्री दिपक केसरकर यांनी जेलभरो आंदोलनाबाबत पुर्वसंध्येला दिली.
आपल्या वाढदिवसाच्या निमीत्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात येथील ८४० युवक युवतींना नोकऱ्यांची निुयुक्तीपत्रे देण्यात येणार आहे. तर अन्य १२०० लोकांना महिन्याभरात नियुक्ती देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
गुरूपौणिमेच्या पुर्वसंध्येला श्री. केसरकर यांच्या निवासस्थांनी श्री.साईबाबाच्या पादुका आल्या होत्या. निमीत्त पुजा झाल्यानंंतर श्री. केसरकर यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले आजचे आंदोलन नेमके कशासाठी आहे. हे मला कळले असते. तर मी त्यावर निश्चीतच तोडगा काढू शकलो असतो. हावेच्या प्रश्नावरुन आंदोलन असेल तर आपण कालच या प्रश्नावरुन पाहणी करून संबधित अधिकाऱ्यांना आवश्क त्या सुचना दिल आहेत. त्यामुळे हा प्रश्न निश्चितच सोडविला जाईल. यात काही शंका नाही आणी हे आंदोलन लोकशाहीच्या ’मार्गाने असल्यामुळे मी त्याला विरोध करणार नाही. ’मात्र थेट आंदेालन न होता चर्चा होणे गरजेचे होते. असे केसरकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले आपल वाढदिवसाचे औचित्यसाधून उद्या आोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्हातील तब्बल आठशे चाळीस युवक युवतीेंना रोजगार देवून त्यांना नियुक्त्या देण्यात येणार आहे. तर अन्य बाराशे लोकांना लवकरच नियुक्त्या देवू असेही त्यांनी सांगितले.

4