संशयित आढळून आल्यास संपर्क करा
सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी/ प्रतिनिधी
ओरोस आदर्शनगर येथील डॉ. दिलीप मोडक यांच्या घरी झालेल्या घरफोडितिल संशयित चोराचे रेखाचित्र तयार करण्यात आले असुन या वर्णनाची व्यक्ती कोठे आढळल्यास त्यांनी सतर्कता पाळावी आणि संबंधिताची माहिती सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याला द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
ओरोस आदर्शनगर येथे डॉक्टर दिलीप मोडक यांचा बंगला असून सोमवारी २४ जून रोजी सकाळी डॉक्टर पणदूर येथील आपल्या दवाखान्यात तर त्यांची पत्नी ओरोस हायस्कूलमध्ये व त्यांचा मुलगा क्लाससाठी निघून गेल्यानंतर लॉक असलेला हा बंगला स. ११ वा. नंतर अज्ञात चोरट्यानी फोडला. डॉक्टर व त्यांचा मुलगा दु. १ वाजता घरी परतले असता घरफोडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी घरफोडी केल्यानंतर दरवाजाचे कडी कोयंडे पुन्हा त्या जागेवर लावून ठेवले होते.
या दाम्पत्याने आपल्या लग्नापासून तयार केलेल्या ३०० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांपासून काही चांदीच्या वस्तू व रोख रकमेसह सुमारे १० लाखांवर या चोरट्यांनी डल्ला मारला व तेथून पोबारा केला होता.
या घरफोडीमध्ये परप्रांतीय असण्याचा दाट संशय असून तिघांना बंगल्याच्या बाहेर फिरताना शेजारच्या काही लोकांनी पाहिल्याचे सांगण्यात येत होते. दोन महिला व एक पुरुष असल्याचेही सांगण्यात येत होते. यात एक पुरुष आणि दोन माहिलां होत्या. त्यातील पुरुषाला आपण कधीही ओळखु शकतो असे त्यांना पाहिलेल्या नीलेश जाधव यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या सहाय्याने सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी संबंधित चोरट्याचे रेखाचित्र तयार करुन ते प्रसिद्ध केले आहे.