इनरव्हील क्लब वेंगुर्ला तर्फे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा…

2

वेंगुर्ले :ता.१६:  इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला तर्फे आज गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळे गुरुतुल्य व्यक्तिमत्व व महिलांच्या मार्गदर्शक मंगलताई परुळेकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मुक्तांगण बालविकास प्रकल्प या त्यांच्या शाळेत मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला इनरव्हील क्लब अध्यक्ष वृंदा गवंडळकर, सचिव गौरी मराठे, आयएसओ प्रणाली अंधारी, अंकिता बांदेकर, अनुराधा वेर्णेकर, उपसभापती स्मिता दामले, अक्षया गिरप तसेच पालक वर्ग उपस्थित होते.

13

4