वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 85 मि.मी. पाऊस

2

सिंधुदुर्गनगरी दि. 16– जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 85 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 37.52 मि.मी. पाऊस झाला आहे. 1 जून 2019 पासू आजपर्यंत एकूण 1517.80 मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसाने जुलैच्या मध्यापर्यंत सरासरी गाठली आहे. यंदाच्या वर्षी आतापर्यंत दीड हजार मि.मी. पेक्षा जास्त सरासरी एकूण पाऊस झाला आहे. वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 1768 मि.मी एकूण पाऊस झाला असून त्या खालोखाल कणकवली 1730 मि.मी व दोडामार्ग 1720 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तर देवगड तालुक्यात आतापर्यंतचा सर्वात कमी पाऊस झाला असून तिथे एकूण 1238 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढील प्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 40 (1720), सावंतवाडी 36 (1306), वेंगुर्ला 53.2 (1609.44), कुडाळ 09 (1505), मालवण 06 (1266), कणकवली 46 (1730), देवगड 25 (1238), वैभववाडी 85 (1768) पाऊस झाला आहे.
00000
वृत्त क्र. 510
देवघर मध्यम प्रकल्पातून 28.07 घ.मी. प्रतिसेकंद विसर्ग सुरू
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 15– कणकवली तालुक्यातील देवघर मध्यम प्रकल्प 61.51 टक्के भरला असून या धरणाच्या विमोचकातून सध्या 28.07 घ.मी. प्रति सेकंद विसर्ग सुरू आहे. सध्या या धरणात 60.2950 द.ल.घ.मी पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 75 मि.मी. इतका पाऊस झाला असून 1769 मि.मी. इतका एकूण पाऊस झाला आहे. यंदाच्या वर्षी घळभरणी झालेल्या अरुणा मध्यम प्रकल्पामध्ये 35.75 टक्के पाणीसाठा झाला आहे.
तिलारी आंतरराज्य प्रकल्प 74.50 टक्के भरला असून धरणात सध्या 333.2830 द.ल.घ.मी पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 17.80 मि.मी पाऊस झाला असून 1872.20 मि.मी. एकूण पाऊस झाला आहे.
जिल्ह्यातील शिवडाव, आडेली, आंबोली, हातेरी, माडखोल, निळेली, पावशी, शिरवल, पुळास, हरकुळ, ओझरम आणि लोरे असे एकूण 12 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. ओझरम लघु पाटबंधारे प्रकल्पातून सध्या 18.59 घ.मी. प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. नाधवडे व सनमटेंब लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 90 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे.

26

4