समृद्ध ग्रंथभांडाराचा उपयोग करा-विवेक खानोलकर

2

व्यासंगी वाचक पुरस्काराने डॉ.राजेश्वर उबाळे यांचा सन्मान…

वेंगुर्ले : ता.१६:
पुस्तके ही ज्ञानाचा अथांग सागर आहे. आपल्या नगर वाचनालयात समृद्ध ग्रंथभांडार आहे. त्याचा उपयोग करुन आपली अभ्यास पावर वाढवली तर जागतिक स्तरावरही यशप्राप्ती होऊ शकेल असे मत वेंगुर्ला तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर यांनी व्यक्त केले.
नगरवाचनालय, वेंगुर्ल्याचा विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात संपन्न झाला. यावेळी तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, संस्था अध्यक्ष अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, कार्याध्यक्ष अनिल सौदागर, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, व्यासंगी वाचक पुरस्कार प्राप्त डॉ.राजेश्वर उबाळे, कार्यवाह कैवल्य पवार उपस्थित होते. पालक विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा, ग्रंथालये व इतर माहितीकेंद्रे देतात. परंतु विद्यार्थ्यांनी अभ्यास मात्र, स्वतः करावा तरच यश प्राप्त होईल. जिल्ह्यातील यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करणारी नगरवाचनालय वेंगुर्ला ही एकमेव संस्था आहे असे गौरवोद्गार गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी काढले. बालवयात इंद्रजात, चांदोबा, टारझन अशा पारंपरिक पुस्तकात रममाण होताना वाचनाचा स्पीड वाढल्याने अभ्यासपूर्ण वाचनातून डॉक्टर व्यवसायात यश संपादन केले. या संस्थेतील आधुनिक वाचनाने समृद्ध ग्रंथालयातून पुस्तके वाचून लेखकाच्या अनुभवातून व्यक्तिमत्व विकास घडविला असे प्रतिपादन यावर्षीचा सुदत्त कल्याण निधी पुरस्कृत सुमित्रा मंत्री स्मृती व्यासंगी वाचक पुरस्कारप्राप्त डॉ.राजेश्वर उबाळे यांनी केले.
कुटुंब, समाज व देशाचा उत्कृष्ट नागरीक बनण्यासाठी स्वतः ‘मी‘ला घडविणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या ग्रंथभांडाराचा लाभ घेऊन स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडावे असे उद्गार अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर यांनी काढले. प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले. दात्यांनी दिलेल्या देणगीतून संस्था अनेक उपक्रम दरवर्षी करीत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना सुप्त गुणांना स्पर्धात्मक युगात वाव मिळण्यासाठी सुद्धा ही संस्था प्रोत्साहन देत आहे. याचा लाभ पालक, शिक्षक, विद्यार्थी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन अनिल सौदागर यांनी केले. या कार्यक्रमाला संस्थेचे उपकार्यवाह नंदन वेंगुर्लेकर, कार्यकारी मंडळ सदस्य शांताराम बांदेकर, प्रा.महेश बोवलेकर, सुशिला खानोलकर,सुमन परब, वीरधवल परब, अरविद बिराजदार,अनिता रॉड्रिक्स, लीना नाईक, सुधर्म गिरप, जगन्नाथ वजराटकर, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

4

4