वेंगुर्लेत दुपारनंतर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी

560
2

पादचारी व वाहनचालकांची तारांबळ

वेंगुर्ले : ता.१६
वेंगुर्लेत आज दुपारपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. केम्प, पावरहाऊस आदी ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने पादचारी व वाहनचालकांची तारांबळ उडाली होती. तसेच त्यांना या पाण्याचा त्रास सहन करावा लागला.
सकाळ पासून हलक्या सरी कोसळणाऱ्या पावसाने दुपार नंतर ढगफुटी प्रमाणे बरसण्यास सुरुवात केली. त्या मुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. आज पौर्णिमा असल्याने पावसाचा जोर वाढल्याचे जाणकार सांगतात. दरम्यान समुद्रालाही उधाण आले असून मोठं मोठया अजस्त्र लाटा येऊन किनाऱ्यावर धडकत आहेत.

4