गिरणी कामगार १८ जुलै रोजी म्हाडा कार्यालयावर आंदोलन छेडणार

274
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी ता.१६: गिरणी कामगार घरांच्या लॉटरी सोडतीत पारदर्शकता यावी यासाठी बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल, श्रीनिवास मिल व गिरणी कामगार कर्मचारी को. आँ. हौ. सोसायटी यांच्यावतीने गुरुवार दि. १८ जुलै रोजी सकाळी ११ वा. बांद्रा येथील म्हाडा कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिल मधील गिरणी कामगार व वारसांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
काही कामगारांनी घराकरिता एकापेक्षा अधिक अर्ज भरले आहेत. शासनाने गठीत केलेल्या मॉनिटरिंग कमिटीने दि. १६ फेब्रुवारी २०१८ रोजी म्हाडाला घराच्या अर्जाची छाननी करावी असे आदेश दिले होते. परंतु त्याबाबत म्हाडाने अद्याप कार्यवाही केली नाही. त्यांच्याकडील सुधारित यादी संकेतस्थळावर अद्याप प्रसिद्ध झाली नाही. अशा स्थितीत लॉटरी निघाल्यास एक अर्ज केलेल्या कामगारांवर अन्याय होणार आहे. असा अन्याय कुठल्याही कामगारावर होऊ नये हाच हेतू आहे. घराच्या सोडतीत पारदर्शकता यावी. अर्जाची छाननी तात्काळ व्हावी. यासाठी कामगार आंदोलन छेडणार आहेत. या आंदोलनात श्रमिक संघटनेचे पदाधिकारी ही सहभागी होणार आहेत. अशी माहिती गिरणी कामगार प्रतिनिधी संतोष मोरे यांनी दिली आहे.

\