जिल्हयात सेट-टॉप बॉक्सचे १८ तारखेपासून वाटप

472
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दीपक केसरकर :हर्ष साबळेंच्या माध्यमातून मिळणार युवकांना रोजगाराच्या संधी

सावंतवाडी, ता.१७:
स्ट्रीम-कास्ट कंपनी आणि जम्प नेटवर्क यांच्या माध्यमातून वितरीत करण्यात येणाऱ्या एक लाख सेट टाॅप बॉक्सचे वितरण १८ जुलै पासून सुरू करण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यात इम्पोर्टेड सेट टॉप बॉक्स देण्यात येणार आहे तर महिनाभरात माजगाव येथील कंपनीत ते तयार करण्यात येणार आहे अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान जिल्ह्यातील लोकांना व्यवसायाच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी हर्ष साबळे सारखे उद्योजक पुढे आले आहेत. त्याचा फायदा जिल्ह्यातील दोन हजारहून अधिक बेरोजगारांना होणार आहे असेही केसरकर यांनी सांगितले.
त्यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली ते म्हणाले कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या इच्छेनुसार या वर्षीचा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यानिमित्त मी सावंतवाडीत उपस्थित राहणार आहे. माझा वाढदिवस मी लोकांसाठी समर्पित करत आहे. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची नवी दालने खुली करून देण्यात येणार आहे. यात 3D व्हर्च्युअल क्लासरूम सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शिक्षण घेता येणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी बागायतदार सक्षम व्हावे या दृष्टीने विविध योजना, गाई, शेळ्या वाटप आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याची जबाबदारी श्री.साबळे यांनी घेतली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात दोडामार्ग मध्ये गाई वाटप तर तळवडे येथे कोंबडी वाटप करण्यात येणार आहे. मागेल त्याला या योजनेचा फायदा देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साडेपाच हजाराहुन अनेक कुटुंबांना याचा निश्चितच फायदा होईल असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.

\